सोलापूर – शहरातील बाळवीस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरामध्ये मानाच्या पहिल्या नंदी ध्वजाची नागफणीचे मानकरी सोमनाथ मेंगाने व सुधीर थोबडे यांच्या हस्ते विधीवत पूजन करून सरावास सुरुवात करण्यात आली. यावेळी राजू स्वामी, शिवयोगी होळीमठ, शांतेश्वर स्वामी, निलाआप्पा वाले यांनी पौराहित्य केले.
यावेळी श्री सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, जगदीश हिरेहबू, मनोज हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू यांच्यासह, जयप्रकाश अमनगी, राजेश अमनगी , राजू भैरवपाटील, विजय भोगडे, रवी कोरे, योगीनाथ कुर्ले , अशोक वाले, गंगाधर कल्याणकर, सोमनाथ सरडे, सागर स्वामी, सागर हुमनाबादकर, प्रथमेश हिरेहबू, शिवराज कडगंची यांच्यासह सिद्धेश्वर भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























