मुखेड / नांदेड – नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगिता देशमुख, मुखेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र बा-हाळी अंतर्गत श्री.शिवाजी सव्हिसेस साखर कारखाना दत्तनगर मांजरी येथे २० नोव्हेंबर रोजी ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
दर बुधवारी,तीन महिन्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अअधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.आकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील उस तोड कामगारांचे आरोग्य चांगले रहावे,स्वास्थ्य चांगले व तंदुरूस्त रहावे.ते निरोगी रहावेत यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे त्यानुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून मुखेड तालुक्यात उसतोड कामगारांची तपासणी करण्यात येत आहे.
यामध्ये रुग्णांची खत,लघवी,बीपी,शुगर यांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात येत आहे.याकामी बा-हाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्राजक्ता झरीकर, आरोग्य पर्यवेक्षक व्यंकट माचनवाड,समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ.अमित मस्कले, आरोग्य निरिक्षक अकबर शेख,आरोग्य सहाय्यक गोपाळ पुल्लेवाड,मारोती कोकुरे,रणजित वाघमारे,श्रिमती इरफाना शेख, सविता गवंदे,एस.एन.इगंळे सह आरोग्य विभागाचे कर्मचारी सर्व आशा वर्कर उपस्थित होते.तीन महिन्यासाठी दर बुधवारी सदरील मोहीम राबविण्यात येणार आहे.तरी उसतोड कामगारांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.



















