धाराशिव – वाशी जिल्हा धाराशिव येथे दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट वाशी यांच्यावतीने दत्त जन्माचा कार्यक्रम गुरुवार दिनांक ४-१२-२०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार २७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रारंभ होणार असून. कार्यक्रमाची सांगता शुक्रवार ५-१२-२०२५ रोजी होणार आहे. संपूर्ण आठवडा किर्तन रत्न ह.भ.प. सुनील महाराज आष्टीकर सेलू जिल्हा परभणी यांचे श्रुसाव्य असे किर्तन होणार आहे.
तबलावादक चैतन्य देशपांडे व हार्मोलिन वादक तेजस रत्नपारखी हिंगोली यांची साथ मिळणार आहे.दि.२७-११- ते ४-१२ या दिवशी दररोज रात्री नऊ वाजता कीर्तनाचा लाभ मिळणार आहे. तसेच गुरुचरित्र पारायण होणार असून दररोज सायंकाळी ४ ते ७ या वेळेस विविध संस्कृत कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार दि.४ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता श्री.स रुद्र अभिषेक सकाळी ११ वाजता पालखी नगर प्रदक्षिणा व सायंकाळी ६ वाजता दत्त जन्म होईल.
या कार्यक्रमासाठी बंडू मोळवणे, महेश कुंभार, रवींद्र लिखिते, विवेक श्रीकृष्ण जोशी, नंदकिशोर बारगजे, भाऊसाहेब माळी, प्रकाश पत्की, हनुमंत अवधूत चेडे, देशमुख हे अन्य दाते पंगत देणार आहे. व शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी दत्तात्रय पांडुरंग महाजन यांच्या महाप्रसादाचे वाटप होणार आहेत. हा कार्यक्रम श्री दत्त मंदिर देवस्थान ब्राह्मण गल्ली वाशी येथे होणार आहे. तरी वाशी व तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे श्री दत्त जन्मोत्सव कमिटी वाशी हे कळवतात. काही अडचण भासल्यास मनोज जोशी, वल्लभ टेकाळे, व नंदकिशोर बारगजे यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.




















