माहूर / नांदेड – माहूर येथील दत्त शिखर गडावर पुढील महिन्यात ०४ डिसेंबर रोजी दत्त शिखर संस्थानकडून भगवान दत्तात्रेय प्रभु यांचा जन्मोत्सव म्हणजेच श्री दत्त जयंती यात्रा महोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने देवदर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयी- सुविधेच्या दृष्टीकोनातून प्रशासनाकडून दि.२५ नोव्हेंबर रोजी दुपारी माहूर पंचायत समितीच्या कै. वसंतराव नाईक सभागृहात यात्रा नियोजनाच्या तयारीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी सर्व उपस्थित प्रशासकीय विभाग प्रमुख आणि प्रतिनिधींकडून आढावा घेत मार्गदर्शक सूचना केल्या. तसेच गैरहजर अधिकारी कर्मचाऱ्यांनी दि.२७ नोव्हेंबर रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला आपापल्या विभागाच्या यात्रा जबाबदारी व तयारीच्या अहवालासह सर्वांना उपस्थित राहण्याच्या सक्त सूचना केल्या.
आजच्या बैठकीस नायब तहसीलदार कैलास जेठे,
नायब तहसीलदार अरुणा सूर्यवंशी, सपोनि शरद घोडके, सहाय्यक गटविकास अधिकारी पि.डी. मुरादे, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग डि. के. भिसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर. डी. माचेवार, एमएसइडीसीएलचे अभियंता आर.बी.शेंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.ए.डी. आंबेकर.आगार प्रमुख चंद्रशेखर समर्थवाड, राष्ट्रीय महामार्गाचे क.अभियंता ए. जी. हजारे, क.अभियंता पी. व्ही. हंचाटे, वनपाल एन. एन. कत्तुलवार,जी.एन. नाईक पो. का. गजानन जाधव, मंडळ अधिकारी चंदनकर, श्री दत्त शिखर संस्थांनचे सचिव प्राचार्य डॉ. गणेश पाटील ठेंगे,पं.स.चे एम.एम. लोणीकर, तलाठी सी.पी.बाबर देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त एस.एल.कोथळकर,श्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त दुर्गादास भोपी, श्री रेणुका देवी संस्थानचे व्यवस्थापक योगेश साबळे यांचे सह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी विभाग प्रमुखांना सक्त सूचना करून दरवर्षीप्रमाणे यात्रा नियोजनात कुठलीही कसर राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले. तसेच २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत सर्वांनी दरवर्षीप्रमाणेच यात्रा नियोजनाच्या आढाव्यासह उपस्थित राहून यावर्षी भाविकांना सोयी सुविधा सुरक्षा मिळावी यासाठी काय नियोजन करण्यात आले याचाही तपशील सोबत घेऊन येण्याच्या सूचना केल्या.




















