वळसंग : दि. २६/११ रोजी मुंबई मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी मा.पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. विलास यामावार उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट विभाग यांच्या नियोजनाखाली वळसंग पोलीस ठाणे येथे सहायक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांच्याकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस विभागामध्ये वापरल्या जाणाऱ्या हत्यारांची — कारवाई, SLR, पिस्तुल, गॅस गन — यांची माहिती व प्रात्यक्षिक देण्यात आले. यासोबतच सायबर अवेअरनेसविषयी सविस्तर मार्गदर्शन तसेच महिला विषयक गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यात आली.

सदर उपक्रमासाठी वळसंग पोलीस ठाण्यातील संपूर्ण कर्मचारीवर्ग, सायबर पोलीस ठाणे सोलापूर, पोलीस मुख्यालयातील स्टॅम्प विभाग, हद्दीतील सर्व पोलीस पाटील तसेच मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक हजर होते.




















