जालना – मंठा तालुक्यातील टाकळखोपा येथुन किनीद्वारे अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच तहसीलदार सुमन मोरे यांच्या पथकाने ता.२६ रोजी कारवाई केली.तर एक टिप्पर पळून जाण्यात यशस्वी झाला असून त्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तळणी परिसरातील रोडवर शासकीय किंवा खाजगी वाहन दिसताच वाळू माफियांची संपूर्ण यंत्रणा सतर्क होते, अशी वस्तुस्थिती असूनही महसूल पथकाने खबर्यांना चकवा देत अवैध वाहतूक करणाऱ्या दोन विनानंबर टिप्पर पकडले.
ही कारवाई शिरपूर–तळणी रोडवर पथक प्रमुख नायब तहसीलदार कल्याण काळदाते, महसूल अधिकारी नितीन चिंचोले, प्रशांत हरिचंद्रे, बीट जमादार नामदेव राठोड, अमोल जेड, कोतवाल राऊत यांनी केली
जप्त करण्यात आलेले दोन्ही टेम्पो पुढील कार्यवाहीसाठी शासकीय गोडाऊनमध्ये जमा करण्यात आले आहेत.
महसूल विभागाच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.


















