Tuesday, June 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

टेंभुर्णीत भरधाव सिमेंट मिक्सरची दुचाकीस धडक; ज्येष्ठ महिलेचा दुर्दैवी मृत्यू

तरुण भारतbyतरुण भारत
December 4, 2025
in marathwada
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टेंभुर्णी : शहरात रस्त्यावरील अतिक्रमण आणि टेंभुर्णी ट्रॅफिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे बेशिस्त वाहतुकीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सातत्याने बसत असून, त्याचा भयावह प्रत्यय मंगळवारी सायंकाळी आला. करमाळा चौकात भरधाव वेगाने आलेल्या पिवळ्या रंगाच्या सिमेंट मिक्सरने पाठीमागून दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील ज्येष्ठ महिलेचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला, तर त्यांचे पती किरकोळ जखमी झाले.

या अपघातात लंकाबाई ज्ञानदेव गदादे (वय ५७, रा. बिजवडी रोड, इंदापूर) यांचा मृत्यू झाला असून, त्यांचे पती ज्ञानदेव गदादे (वय ६०) हे जखमी झाले आहेत.

ज्ञानदेव व लंकाबाई गदादे हे त्यांच्या यामाहा दुचाकीवरून (क्र. एमएच-४२-आर-८००७) पत्नीच्या भाचीस भेटण्यासाठी माढा तालुक्यातील वेणेगाव येथे गेले होते. त्यानंतर टेंभुर्णी येथील कुटे वस्तीवर लंकाबाई यांच्या बहिणीला भेटून ते इंदापूरकडे परतत असताना सायंकाळी सुमारे पाच वाजता करमाळा चौकात हा अपघात झाला.

पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या सिमेंट मिक्सरने दुचाकीस जोरात धडक दिली. धडकेनंतर लंकाबाई गदादे यांच्या पायावरून मिक्सरचे चाक गेल्याने त्यांचा पाय अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्या रस्त्यावर जोरात आदळून गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने अकलूज येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पतीस बाजूला पडल्याने किरकोळ जखमा झाल्या आहेत.

दरम्यान, टेंभुर्णी शहर हे अनेक महामार्गांनी जोडलेले असल्याने येथे दुचाकी, चारचाकी, मालट्रक, कंटेनर, सिमेंट बल्कर, अवजड वाहने, शाळेची वाहने तसेच सध्या उसाचे कारखाने चालू झाल्यामुळे ऊस वाहतुकीच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे ट्राफिक पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याने वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन, भरधाव वेग, उलट दिशेने वाहने चालविणे, रस्त्यावरील अतिक्रमण व चढ्या-उतार ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. लहान मुले व वृद्धांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते.

करमाळा चौकात स्पीड ब्रेकरचा अभाव, नियमित वाहतूक पोलिसांची नेमणूक नसणे आणि अतिक्रमणांवर कारवाई न होणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या घटनेनंतर टेंभुर्णी शहरातील बेशिस्त वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post Views: 53
Previous Post

मनपा कामगार कल्याण जनसंपर्क, आरोग्य विभागातर्फे दिव्यांगांसाठी फिजिओथेरपी शिबिर 

Next Post

कै. विठ्ठलरावजी शिंदे विद्यालयात १६ सायकलींचे वाटप, पंचायत समिती सेस फंडातून मदत

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कै. विठ्ठलरावजी शिंदे विद्यालयात १६ सायकलींचे वाटप, पंचायत समिती सेस फंडातून मदत

ताज्या बातम्या

अधिक मास जीवावर बेतला; गोदावरीत बुडून तिघींचा मृत्यू

अधिक मास जीवावर बेतला; गोदावरीत बुडून तिघींचा मृत्यू

June 15, 2026

सांगोला पोलिसांची अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई

June 14, 2026

गोंदवले मसवड देवदर्शन करून येणाऱ्या पंढरपूरच्या भाविकांच्या पिकप ला अपघात पिकप विहिरीत पडून ८ जणांचा मृत्यू ७ जण जखमी  !

June 14, 2026

छोटा हत्ती विहीरीत पडुन  आठ जणांचा दुर्दैवी मृत्यु

June 14, 2026
प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीची १०० टक्के कर्ज वसुली

प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीची १०० टक्के कर्ज वसुली

June 14, 2026
योगातून आरोग्याचा संदेश; राष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात जनजागृती रॅली

योगातून आरोग्याचा संदेश; राष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात जनजागृती रॅली

June 14, 2026
लोकसहभागातून इंगळगी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट!

लोकसहभागातून इंगळगी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट!

June 14, 2026
श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

June 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0911133

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697