अक्कलकोट – अक्कलकोट तीर्थक्षेत्र नगरीत श्रीदत्तजयंती जयंती उत्सव हा प्रमुख उत्सव आहे मोठ्या प्रमाणात भाविक येतात पालखी मिरवणुक सोहळा निघतो पालखी मिरवणुक मार्गातील खडी दगड माती भाविकाना त्रास होईल व तीर्थक्षेत्र नगरीची शोभा यास बाधा येईल असे तस्मम वगैरे तात्काळ दुर करून पालखी मार्गातील अडथळे तात्काळ दुर करा अशी मागणी भाविकातुन व्यक्त होत आहे .
अक्कलकोट हे एक महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह मधील तीर्थक्षेत्र आहे वर्षभर येथे गुरुपोर्णिमा उत्सव ‘ गुरु प्रतिपदा , प्रगट दिन ,पुण्यतिथी उत्सव , दत्तजयंती उत्सव , यासह विविध उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात . यानिमित्य महाराष्ट्रातुन पायी पालखी दिंडी सोहळे येतात . दत्त जयंती उत्सव दुसऱ्या दिवशी शहरात पालखी सोहळा मिरवणुक निघते .
या मार्गात त्रिमुर्ती दुकान कापसे मेडीकल महिंद्रकर मेडीकल आदि परिसरात तसेच वटवृक्ष मंदिर ते राजेफत्तेसिह चौक ‘ समर्थ चौक , तुप चौक कापड व्यापारी दुकान ‘ कारंजा चौक समाधी मठ बुधवार पेठ ‘ दावल बॅन्ड सुभभाष गल्ली , राम गल्ली , भारत गल्ली , देशमुख गल्ली आदि पालखी मार्गातील अडथळे त्वरीत दुर करावेत अशी मागणी नागरिकातुन होत आहे

























