Wednesday, July 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जळकोट :- येथील मनसेच्या रास्ता रोकोस प्रचंड प्रतिसाद, ३० नोव्हेंबर पर्यंत काम पूर्ण करण्याची NHI अधिकाऱ्यांची ग्वाही

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 19, 2022
in highways
0
जळकोट :- येथील मनसेच्या रास्ता रोकोस प्रचंड प्रतिसाद, ३० नोव्हेंबर पर्यंत काम पूर्ण करण्याची NHI अधिकाऱ्यांची ग्वाही
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गेल्या आठ ते दहा वर्षापासुन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ सोलापूर ते हैद्राबाद या महामार्गाचे काम अतिशय संथगतीने सुरू असून ते रेंगाळलेल्या अवस्थेत होते . याबाबत हे काम जलद गतीने पूर्ण करून तातडीने रस्ता दुरुस्त करावे व महामार्गावरील सर्व अर्धवट कामे तात्काळ सुरू करून सर्व उड्डाण पुलांची कामे, सर्विस रोडची कामे तसेच या संपूर्ण महामार्गावर पडलेले खड्डे बुजवून त्यावर नव्याने डांबरीकरण करण्यात यावे . यासह अन्य मागण्यासाठी आज दि. १९ नोव्हेंबर रोजी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या नेतृत्वाखाली जळकोट येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .

जवळपास दीड तास हे आंदोलन चालले . आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत होण्यासाठी तब्बल तीन ते चार तास लागले . यावेळी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष नवगिरे म्हणाले की रस्त्याची अर्धवट कामे व खड्ड्यांमुळे ज्या लोकांचे प्राण गेले त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपये व ज्यांना अपघातामुळे कायमचे दिव्यांगत्व आले त्यांना प्रत्येकी१० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी . दि ३० नोव्हेंबर पर्यंत अणदूर, जळकोट, आष्टामोड, येणेगुर, दाळिंब, रामपूरपाटी येथील खड्डे बुजवून त्याठिकाणी नवीन डांबरीकरण करावे, नळदुर्ग बायपास रोडचे काम जलद गतीने पूर्ण , जळकोट गाव जिल्हा परिषद शाळा, आलियाबाद कडे जाणाऱ्या रस्त्याची लेवल काढून चढ उतार कमी करावा, हंगरगा रोडवर मेडन ओपनिंग ठेवावे, एमएच २५ पासिंग असणाऱ्या सर्व कमर्शियल वाहनांना टोल मधून पन्नास टक्के सूट देण्यात यावी, नळदुर्ग बायपास रोडचे काम पूर्ण होईपर्यंत नळदुर्ग घाटातील जुन्या रोडवर तात्काळ अपघात नियंत्रण यंत्रणा उभारण्यात यावी जेणेकरून घाटामध्ये अपघात होणार नाहीत व झाल्यास तातडीने वाहतूक सुरळीत होईल, बोरमन तांडा येथील रस्त्यावर मेडनओपनिंग तयार करावे . असे सांगून यांसह व अन्य मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले हे निवेदन स्वीकारण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी निवासी अभियंता महेश उटगे,एस टी पी एल कंपनीचे प्रकल्प प्रमुख अनिल शर्मा, मंडळ अधिकारी पी एस भोकरे, नळदुर्ग पोलीस स्टेशनचे सपोनि सिद्धेश्वर गोरे उपस्थित होते .

या आंदोलनादरम्यान एक रुग्णवाहिका आली असता आंदोलनकर्त्यांनी भाषणे सुरू असतानाही त्या रुग्णवाहिकेला रस्ता करून दिला . मनसेचे निवेदन स्वीकारल्यानंतर नवगिरे यांनी केलेल्या मागण्यांचा विचार करून एन . एच . ए . आय . च्या अधिकार्‍यांनी, सदर महामार्गावरील खड्डे बुजवून नवीन डांबरीकरणाचा लेयर येत्या ३० नोव्हेंबर पर्यंत केवळ अकरा दिवसात पुर्ण करण्याचे जाहीर केले .या रास्ता रोको आंदोलनासाठी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महेश जाधव, अविनाश साळुंखे, जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, तुषार वराडे, तुळजापूर तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, लोहारा तालुकाध्यक्षअतुल जाधव, नळदुर्ग शहराध्यक्ष अलीम शेख, सचिव प्रमोद कुलकर्णी, उपाध्यक्ष रमेश घोडके, उमरगा शहराध्यक्ष हेमंत बनसोडे, तुळजापूर तालुका संघटक गणेश पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रशांत गरड, मनविसे उपजिल्हाध्यक्ष जयकुमार घोगरे, धनंजय मडोळे, वैभव स्वामी, अजय डांबरे, विशाल घोरपडे, आकाश पटणे, मनोज लष्करे, पिंटू सुरवसे, सुनील पवार, शंकर चव्हाण, बाबू चव्हाण, सतीश राठोड, सागर राजमाने, राहुल धनशेट्टी,
भिमा राठोड, नागराज कदम, बालाजी लोखंडे यांच्यासह मनसे कार्यकर्ते, जळकोट व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे यावेळी पोलीस बंदोबस्त ही चोख ठेवण्यात आला होता .

Post Views: 226
Previous Post

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करताना सर्वंकष, परिपूर्ण करावा अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत केल्या.

Next Post

एस.टी. बस थांबत नसल्याच्या कारणावरून निलंगा तालुक्यातील उमरगा हाडगा येथे विद्यार्थ्यांचे दोन तास रास्ता रोको आंदोलन…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
एस.टी. बस थांबत नसल्याच्या कारणावरून निलंगा तालुक्यातील उमरगा हाडगा येथे विद्यार्थ्यांचे दोन तास रास्ता रोको आंदोलन…

एस.टी. बस थांबत नसल्याच्या कारणावरून निलंगा तालुक्यातील उमरगा हाडगा येथे विद्यार्थ्यांचे दोन तास रास्ता रोको आंदोलन...

ताज्या बातम्या

आस्था सामाजिक संस्थेस सावित्री रत्न पुरस्कार देऊन गौरव

June 30, 2026
विद्यार्थ्यांसाठी आणखी एक आनंददायी आणि आधुनिक शैक्षणिक पाऊल! 

विद्यार्थ्यांसाठी आणखी एक आनंददायी आणि आधुनिक शैक्षणिक पाऊल! 

June 30, 2026

शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई मिळावी

June 30, 2026

१ ते ९ जुलैदरम्यान शहरात विशेष स्वच्छता मोहीम

June 30, 2026

शिक्षण विभागात प्रशासकीय फेरबदल; माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी शाखेची जबाबदारी भरत कारसले यांच्याकडे

June 30, 2026

एन. एच .एम.कर्मचाऱ्यांना अखेर न्याय! १० वर्षांहून अधिक सेवा असलेल्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा मार्ग मोकळा

June 30, 2026
टीईटी मुक्ती संदर्भात ABRSM संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने खासदारांना निवेदन 

टीईटी मुक्ती संदर्भात ABRSM संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने खासदारांना निवेदन 

June 30, 2026
प्रा. डॉ. अंबादास भासके यांना ‘आदर्श प्राध्यापक पुरस्कार’ प्रदान

प्रा. डॉ. अंबादास भासके यांना ‘आदर्श प्राध्यापक पुरस्कार’ प्रदान

June 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0950449

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697