अक्कलकोट – नॉर्थ पोलीस स्टेशन, अक्कलकोट येथे लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटचे अध्यक्ष लायन अभय खोबरे यांच्या प्रयत्नाने आणि महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन उतर पोलीस निरीक्षक दीपक भिताडे, यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या रक्तदान उपक्रमात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजहितासाठी मोलाचे योगदान दिले. सर्व रक्तदात्यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी ला. पंडीत – सचिव एस पंडीत खजिनदार ला विठ्ठल तेली, झोन चेअरमन मल्तीकार्जुन मसुती माजी प्रांत पाल ला . राजशेखर कापसे ला. शिवपूत्र हळगोदे ला. राजेंद्र हत्ते ला. प्रभाकर मजगे ला. गौरीशंकर चनशट्टी ला. महेबुब सलगरकर ला. साखरे सुधीर. माळशट्टी ला. शरीद वळसंगकर ला. शिवशरण खुबा उपस्थित होते .

















