धाराशिव – इटानगर, अरुणाचल प्रदेश येथे झालेल्या 69 व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमधील कांस्यपदक विजेती खेळाडू संस्कृती कपाळे हिचा आज अभिनव इंग्लिश स्कूल येथे संस्थेचे संचालक श्री सतीश मोदानी ,प्राचार्य सौ प्रतिभा मोदानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने आयोजित राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये सतरा वर्ष मुलींच्या 32 किलो खालील वजनी गटामधून संस्कृतीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते.
राष्ट्रीय शालेय स्पर्धा खेळत असताना तिने जम्मू काश्मीर ,छत्तीसगड व अरुणाचल प्रदेश च्या खेळाडूवर एकतर्फी मात करत कांस्य पदक मिळवले.
तिला तायक्वांदो प्रशिक्षक राजेश महाजन ,राम दराडे कांबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले असून तिचे सर्व शिक्षक, शिक्षिका व पालक यांनी अभिनंदन केले.






















