सोलापूरची कन्या कु.किर्ती नंदकिशोर भराडिया वय 16 वर्षे हि गुरुवार दि.24/11/2022 रोजी मुंबई येथील अरबी समुद्रात वरळी सी लिंक ते गेट वे ऑफ इंडिया हे समुद्री 36 किलोमीटर चे अंतर न थांबता पोहून विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहे. सदर चे अंतर पार करण्याकरिता किर्ती सलग 8 ते 10 तास समुद्रात पोहणार आहे.
किर्ती वरळी सी लिंक येथून सकाळी 11 वाजता पोहण्यास सुरुवात करेल व सायंकाळी अंदाजे 8 वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे पोहोचेल. या करिता किर्ती मागील 7-8 महिन्यांपासून मार्कंडेय जलतरण तलाव, सोलापूर येथे नियमित 6-7 तास सराव करत आहे आणि विशेष म्हणजे मागील 1 महिन्यापासून ती मुंबई येथे समुद्रात सुद्धा पोहण्याचा सराव करीत आहे.
अशी माहीती नंदकिशोर भराडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी किर्ती भराडिया स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी झुबीन हमारी या सोलापूर जिल्हा उशीर जलतरण संघटनेचे अध्यक्ष सुदेश माने रोटरी क्लबचे अध्यक्ष कालिदास जाजू श्रीकांत शेटे जयेश पटेल शामसुंदर भराडिया या प्रताप सूर्यवंशी आदी उपस्थित होते.