सांगोला – सांगोला नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र.१ अ मधून राणी आनंदा माने आणि प्रभाग क्रमांक-११ अ मधून सुजाता चेतनसिंह केदार सावंत यांची बिनविरोध निवड झाली.
जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आम्हाला तसेच शिवसेनेचे शहाजीबापू पाटील, भाजपचे बाळासाहेब केदार, बाळासाहेब एरंडे यांसह सर्वांना विनंती केल्याने सांगोला शहर विकास आघाडीने समन्वयाची भूमिका घेतली. त्यामुळेच या बिनविरोध निवडी शक्य झाल्या आहेत. त्यामुळे शहाजीबापू पाटील यांनी या जागांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये तसेच भविष्यातही आमची आघाडी अभेद्यच राहणार आहे असे स्पष्टीकरण आ.डॉ.बाबासाहेब देशमुख आणि माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिले.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपवून आम्ही सांगोला शहर विकास आघाडीतील नेतेमंडळींना एकत्रित घेऊन लवकरच सांगोला येथे सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत असेही यावेळी आ.डॉ.देशमुख व माजी आ.साळुंखे पाटील यांनी सांगितले. सध्या ते दोघेही हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे उपस्थित आहेत.

















