सांगोला -परमार्थ हा कृतीवर आधारित नसतो तर तो आपल्या वृत्तीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपण आपली वृत्ती सुधारली पाहीजे. त्यासाठी साधकांनी विहीत कर्माद्वारे पुण्याचा संचय केला पाहिजे असे उदगार हभप.डॉ.जयवंत महाराज बोधले यांनी काढले. ते सांगोला येथील ध्यान मंदीरात श्री समर्थ सदगुरु गोंदवलेकर महाराज यांच्या ११२ व्या पुण्यतिथी निमित आयोजित प्रवचनात बोलत होते.
या उत्सवाच्या निमित्ताने ध्यान मंदीर येथे मंगळवार दि.९ ते गुरुवार दि.११ डिसेंबर २०२५ या दिवशी दररोज संध्या.६ ते ८ वाजेपर्यंत हभप.डॉ.जयवंत महाराज बोधले यांचे नामस्मरण व अभ्यास या विषयावर प्रवचन संपन्न होत आहेत. गेले तीन चालू असलेल्या सुश्राव्य अशा प्रवचनांमुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले.
हभप.डॉ.जयवंत महाराज बोधले यांनी यावेळी बोलताना अनेक उदाहरणातून पाप पुण्याबाबत विचार मांडताना संत तुकाराम महाराजांनी पाप आणि पुण्याची सर्वात सोपी पद्धत करून सांगितली असून ती आपण समजून घेतली पाहीजे असेही ते म्हणाले.



















