सोलापूर : भारतीय संविधान दिनानिमित्त सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली संविधान गौरव परीक्षा सोलापूर शहर आणि जिल्हयात आज उत्साहात संपन्न झाली. सोलापूर शहरात लोकराजा अभ्यासिका आणि विश्वभुषण विद्यालय तसेच माढा तालुक्यातील मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव या केंद्रावर ही परीक्षा संपन्न झाली. शेकडो विद्यार्थ्यांनी या परीक्षेत आपला सहभाग नोंदविला.
ही परीक्षा ८ वी ते १२ वी आणि १२ वी पुढील ( पदवी, पदव्युत्तर पदवी) अशा दोन गटांत घेण्यात आली होती. भारतीय संविधानाबद्दल जनजागृती करण्यासाठी, संवैधानिक मूल्ये समाजात रुजविण्यासाठी ही परीक्षा गेल्या ५ वर्षांपासून ही परीक्षा आयोजित केली जात राज्यकर निरीक्षक बुद्धजय भालशंकर यांनी सांगितले.
या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण १५ हजार रुपयांची रोख शिष्यवृती, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते शनिवार दिनांक २७ डिसेंबर रोजी शिवस्मारक सभागृह सोलापूर येथे प्रदान करण्यात येणार आहे.
संविधान दररोजच्या जीवनात किती महत्वाचे आहे, संविधान साक्षर झाल्यावर कोणते फायदे होतात आणि कोणते अनर्थ टळतात हे दर्शविण्यासाठी गेली पाच वर्षांपूर्वीपासून हा विचार यज्ञ सुरु केला असल्याचे राज्य कर निरीक्षक, अभियंता, प्रतिथयश लेखक बुद्धजय भालशंकर यांनी सांगितले.
परीक्षेच्या यशस्वीतेसाठी आशुतोष तोंडसे, मुक्ता आतकरे, विनोद वर, सत्यवान पाचकुडवे, ज्योती चव्हाण, भौरम्मा वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
















