Monday, February 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आता भारत डिवचणार्‍यांना सोडत नाही ! – संजय सेठ, संरक्षण राज्यमंत्री

तरुण भारतbyतरुण भारत
December 15, 2025
in marathwada
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली – भारत भूमी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याची आणि विश्वकल्याण इच्छिणार्‍या सनातनी संस्कृतीची आहे. दुर्दैवाने मागील ६० ते ६५ वर्षांत आपल्याला अकबर-बाबरसारख्या आक्रमकांना ‘महान’ म्हणत गुलामगिरीच्या मानसिकतेत बंदिस्त केले गेले. गुलामगिरीची ती सारी चिन्हे आणि बेड्या पूर्णपणे तोडल्या जात आहेत. आता नवीन भारत जागा झाला आहे. जो कुणापुढेही झुकत नाही आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आपल्या सैनिकांनी दाखवलेले शौर्य जगासमोर सिद्ध झाले आहे. आता भारताला डिवचणार्‍याला आम्ही सोडत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय सेठ यांनी केले. ते नवी दिल्ली येथील भारत मंडपम् येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील ‘राष्ट्रीय सुरक्षितेत सामाजिक-सांस्कृतिक संस्थांचे योगदान’ या विषयावर बोलत होते.

श्रीराम मंदिरासाठीचा न्यायालयीन लढा ही श्रीरामाने दिलेली अनुभूतीच ! – अधिवक्ता श्रीधर पोतराजूसर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता श्रीधर पोतराजू म्हणाले, ‘श्रीराम मंदिरासाठी हिंदूंनी न्यायालयाबाहेर दिलेला लढा अपूर्व आहे; मात्र आम्ही अधिवक्त्यांनी त्याविषयी न्यायालयात दिलेला लढा म्हणजे श्रीरामाने आम्हा सर्वांसाठी दिलेली त्याच्या अस्तित्वाची अनुभूतीच आहे. श्रीरामाच्या कृपेमुळेच ऋषितुल्य ज्येष्ठ अधिवक्ता केशव परासरन् यांनी वयाच्या ९२ व्या वर्षीही हा लढा जोमाने दिला. 

त्यांच्यात दुर्दम्य श्रद्धा निर्माण 

करणाराही श्रीरामच होता.

चिक्कमंगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपीठात होणारे नमाजपठण लवकरच बंद होईल ! – प्रमोद मुतालिकया वेळी श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले,  कर्नाटकातील चिक्कमंगळुरू येथून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या दत्तपिठाच्या ठिकाणी श्री गुरु दत्तात्रेयाने साधना केली होती; मात्र टिपू सुलतानने तेथे बाबा बुडन दर्गा स्थापन केला. त्यानंतर तेथील शेकडो एकर परिसराचे मजारी, थडगी, दफनभूमी, दर्गा, गोमांसभक्षण यांमुळे इस्लामीकरण झाले होते; मात्र गेली ३० वर्षे विश्व हिंदु परिषद, श्रीराम सेना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केलेली आंदोलने आणि दिलेला न्यायालयीन लढा यांमुळे ९० टक्के परिसर दत्तभक्तांचा बनला आहे. आता शुक्रवारी नमाजपठण करायला मौलवी येतो. तेही लवकरच न्यायालयाच्या आदेशाने बंद होईल.

मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी हिंदूंनी एकत्र यावे ! – सुनील घनवट     मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आहेत; म्हणून मंदिरे व मंदिरातील परंपरांचे रक्षण होण्यासाठी ‘मंदिर महासंघा’ने १५ हजार मंदिरांचे संघटन केले आहे. त्यातून २ हजार ३०० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याचा परिणाम म्हणून केवळ देशातच नव्हे, तर ऑस्ट्रेलियासारख्या देशातही वस्त्रसंहिता लागू झाली आहे. मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे प्रत्येक आठवड्याला २० हजार हिंदू आरतीसाठी एकत्र येतात. त्यामुळे त्यांचे रक्षण करण्यासाठी एक होणे हे आपले धर्मकर्तव्यच आहे, असे 

प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महारष्ट्र व छत्तीसगड राज्यांचे संघटक व मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. या सत्राचे सूत्रसंचालन पत्रकार श्वेता त्रिपाठी यांनी केले.

Post Views: 23
Previous Post

श्रीक्षेत्र बाळे येथील खंडोबा मंदिरात यात्रेच्या शेवटच्या रविवारी भाविकांची मांदियाळी 

Next Post

जन्नतुल फिरदोस कब्रस्तान‎चा होणार विकास – किसन‎ जाधव

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जन्नतुल फिरदोस कब्रस्तान‎चा होणार विकास - किसन‎ जाधव

ताज्या बातम्या

सपकाळ सारख्या प्रवृत्तीवर सरकार अंकुश लावेल.#public #viral #breakingnews #एकनाथशिंदेसाहेब

February 16, 2026

पानगाव मध्ये अफूच्या अवैध लागवडीचा मोठा प्रकार उघडकीस..#viral #public #marathinews #solapurnews

February 16, 2026

कळंब येथे दोन गटात तुंबळ हाणामारी.#vairal #पब्लिक

February 16, 2026

ढासला येथे संजय गांधी निराधार योजनेत मोठा घोटाळा.#public #solapurnews

February 16, 2026

आव्हाना येथे आदर्श विवाह सोहळा संपन्न.#public

February 16, 2026

करकंब मध्ये मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी.#viral

February 16, 2026

विविध प्रलंबित मागण्यासाठी लिपिक वर्गीय संघटनेने केले कामकाज बंद आंदोलन.#viral #public #solapurnews

February 16, 2026

महाराष्ट्राचा शिवकालीन मर्दानी खेळ जगभरात पोहोचवण्यासाठी सोलापूरची रणरागिणी सज्ज.#viral #शिवजयंती

February 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0683301

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697