सांगोला – २७ वा क्रीडा महोत्सव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे दि.४ ते ८ डिसेंबर रोजी संपन्न झाला. या स्पर्धेमध्ये सांगोला महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुजाता बाबर हिने उंच उडी क्रीडा प्रकारांमध्ये १.५१ मीटर उंच उडी घेऊन गोल्ड मेडल मिळविले.
याबद्दल तिचा महाविद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्राध्यापक वर्ग, क्रीडा समिती सदस्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष तात्यासाहेब केदार व प्रा.पी.सी.झपके, खजिनदार नागेश गुळमिरे, सचिव ऍड.उदयबापू घोंगडे, सहसचिव साहेबराव ढेकळे, खेळाडूस मार्गदर्शन करणारे प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले व क्रीडा शिक्षक प्रा.जगदीश चेडे यांनी सुजाता बाबरचे अभिनंदन केले.

















