सोलापूर – विकास सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राजगोपाल चंडक आणि उपाध्यक्षपदी श्री राजेंद्र आसावा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सहाय्यक निबंधक तथा अध्यासी अधिकारी श्री उमेश उद्धवराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक झाली. राजगोपाल चंडक यांना अध्यक्षपदाच्या साठी सूचक म्हणून सीए राजगोपाल मिणियार व अनुमोदक म्हणून हरीनिवास जाजू यांनी प्रस्ताव मांडला. उपाध्यक्ष राजेंद्र आसावा यांना राजकुमार राठी हे सुचक तर कमलकिशोर राठी यांनी अनुमोदन दिले.
निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सीए राजगोपाल मिणियार यांनी मावळते अध्यक्ष कमलकिशोर राठी यांच्या कार्याचा गौरव केला व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी संचालक हरिनिवास जाजू, ओमप्रकाश तिवाडी, नवनीत तोष्णीवाल, मनीष बलदवा, नंदकिशोर मुंदडा, चंद्रशेखर स्वामी, सुरेश बिटला , अनुराधा चांडक, शंकर धोडमनी तसेच बँकेचे व्यवस्थापक सीए पांडुरंग मंत्री उपस्थित होते.

















