सांगोला – भगवत भक्त शारदादेवी (काकी) साळुंखे-पाटील यांच्या ८४ व्या जयंती निमित्त त्यांच्या व आ.काकासाहेब साळुंखे- पाटील, शकुंतलादेवी (थोरल्या काकी) यांच्या आज बुधवार दि.३१ डिसेंबर रोजी स.९ ते १२.३० दरम्यान शारदाई वात्सल्यधाम, अंबिकावस्ती, आलेगाव रोड, जवळे (ता.सांगोला) येथे विधिवत पादुका प्राणप्रतिष्ठा सोहळा, दिंडी सोहळा व अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पादुकांची प्राणप्रतिष्ठा किरण घाडगे, जयदीप घाडगे, निलरुद्र कदम, कात्यायनी पाटील, राजवीर काटकर, युगंधर पाटील, देवीना कदम, सयाजीराजे गायकवाड, आऋष गायकवाड, अयांश आम्रे, अद्वैत गायकवाड, ज्योतिरादित्य गोरे, दाक्षायणी गोरे या परतवंडांच्या हस्ते होणार असून जवळे हायस्कूल मधून दिंडीचे प्रस्थान होणार आहे. नारायण मंदिर येथे पादुकांचे विधीवत पूजन केले जाणार असून गाव प्रदक्षिणा दिंडीद्वारे घातली जाणार आहे. दिंडी सोहळ्यामध्ये रिंगण, मनोरे, भजनी मंडळ व गावातील समर्थ संप्रदाय, दत्त संप्रदाय व आध्यात्मिक मंडळातील महिला जलाचे कलश घेऊन सहभागी होणार आहेत. तरी या भक्ती सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.प्रदीप साळुंखे-पाटील, माजी आ.दिपकआबा साळुंखे-पाटील, चारुशीला काटकर, माजी जि.प.अध्यक्षा जयमाला गायकवाड यांनी केले आहे.


















