वळसंग – तालुका दक्षिण सोलापूर येथे लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सोलापूर यांचे वळसंग शाखे येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचे गुणगान करून सत्कार करण्यात आला.
प्रथमतः सरस्वती मातेचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दैनिक सकाळचे दिनकर नारायणकर, दैनिक तरुण भारतचे कल्लय्या स्वामी, बी आर न्यूज चैनल चे अल्ताफ पटेल या पत्रकारांना पतसंस्थेच्या पदाधिकारी कडून सत्कार करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच महादेव होटकर, निवृत्त शिक्षक सन्मुख स्वामी, व्यापारी श्रीनाथ निंबाळकर, लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेचे शाखाधिकारी श्रीशैल स्वामी इतर कर्मचारी आराध्या कुरले, वैष्णवी पारसवार, सुषमा चिंचोळी,नवनीत पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. दिनकर नारायणकर यांनी पत्रकारांना सत्कार केल्याबद्दल पतसंस्थेचे आभार मानले.























