सोलापूर – शहर पोलिसांकडून धडाकेबाज कामगिरी करण्यात आली आहे. तिघांना जेरबंद करत ०२ देशी बनावटीचे पिस्टल, ०८ काडतुसे व मोटारसायकलसह २ लाख १६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिका निवडणूक २०२५ चे अनुषंगाने शहरामध्ये अवैध शस्त्र/अग्नीशस्त्राचा वापर करून घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विशेष मोहिम घेवून कारवाई करण्या संदर्भात मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने दि. ११/०१/२०२६ रोजी गुन्हे शाखेकडील पोह/संताजी रोकडे व पोकों/भारत पाटील यांना गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, ” डी.आर.एम. रेल्वे ऑफिसचे बाजुस असलेल्या रेल्वे कॉलनीचे वॉल कंपाऊंड लगत मोकळ्या जागेत तीन इसम हे त्यांचेकडील काळया रंगाचे युनिकॉर्न मोटार सायकलवर थांबले असुन त्यांचेकडे देशी बनावटीचे पिस्टल आहेत.
प्राप्त बातमी बाबत अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना सविस्तर माहिती देवून वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील स.पो.नि. दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथक असे प्राप्त माहितीचे आधारे सदर ठिकाणी गेले असता त्यांना तेथे एक काळया रंगाची युनीकॉर्न मोटार सायकलवर ०३ इसम संशयास्पद स्थीतीत थांबल्याचे दिसून आले. म्हणून स.पो.नि. दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकाने नमूद इसमांना शिताफिने जागीच ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या तीन इसमांना त्यांचे नाव, पत्ता व इतर माहिती विचारली असता त्यांची नावे महंमदरफिक लालसाब जातगर ऊर्फ मनगोळी, वय-२६ वर्ष, व्यवसाय मजुरी रा. जातगर वस्ती, हुलगम्मा मंदीर जवळ, अलमेल, ता. सिंदगी, जि. विजापूर, राज्य कर्नाटक, मोटार सायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाचे नाव राजा नुरजानसाब सौदागर, वय-२६ वर्ष, व्यवसाय बेकार रा. वॉर्ड नंबर ०९, एकनंदी कॉलेज जवळ, भारत नगर, अलमेल, ता. सिंदगी, जि. विजापूर, राज्य कर्नाटक, मोटार सायकल जवळ उभा राहीलेल्या इसमाचे नाव प्रदीप सुर्यकांत काळभोर, वय-३५ वर्ष, व्यवसाय मेकॅनिक रा.लोणी स्टेशन जवळ, तुळजाभवानी मंदीर पुढे, इंदिरा नगर, कदम वस्ती, लोणी काळभोर, पुणे असे सांगीतले. त्यानंतर पंचासमक्ष नमूद इसमांची अंगझडती घेतली असता इसम नामे राजा नुरजानसाब सौदागर, याच्या कंबरेस डाव्या बाजूस पँटमध्ये खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्टल व खिशामध्ये ०५ काडतुसे मिळुन आली.
तसेच, इसम नामे प्रदीप सुर्यकांत काळभोर याच्या कंबरेस डाव्या बाजूस पँटमध्ये खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्टल व खिशामध्ये ०३ काडतुसे मिळुन आली. त्याअनुषंगाने मिळून आलेल्या अग्नीशस्त्राचे परवान्या बाबत नमूद इसमांकडे अधिक चौकशी केली असता त्यांचेकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याचे व सदरचे दोन्ही पिस्टल व ०८ काडतुसे विक्री करण्याचे उद्देशाने आल्याचे सांगितले. त्यानुसार नमूद इसमांविरूध्द सदर बझार पो. स्टे सोलापूर शहर येथे गु.र.नं-२७/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा नोंद करणेत आला आहे.
अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडील स.पो.नि. दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकानी नमुद ०३ इसमांचे ताब्यातून ०२ देशी बनावटीच पिस्टल व ०८ काडतुसे व होंडा कंपनीचही युनिकॉर्न मोटार सायकल असा एकूण २ लाख १६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कामगिरी ही एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्वीनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), राजन माने, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार संताजी रोकडे, अनिल जाधव, महेश शिंदे, भारत पाटील, कुमार शेळके, राजु मुदगल, महेश पाटील, महेश रोकडे, अंकुश भोसले, सुभाष मुंडे, सिध्दाराम देशमुख, राजेश मोरे, अजय गुंड, सायबर पो.स्टे. कडील प्रकाश गायकाड, मच्छिद्र राठोड, चालक, सतिश काटे, बाळु काळे यांनी केली आहे.

















