पिलीव – माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथे माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या स्थानिक विकास निधीमधून मंजूर झालेल्या कामाचे भूमीपूजन व लोकार्पण त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले यामध्ये पंढरपूर _ सातारा महामार्ग ते शेंडगे वस्ती _ धायगुडे वस्ती लोकार्पण करण्यात आले,धायगुडे वस्ती येथील हनुमान मंदिरासमोरील सभामंडपाचे भूमिपूजन, तसेच परमेश्वर लेंगरेवस्ती ते पोपट माने वस्ती रस्ता भूमीपूजन या तिन कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार उत्तमराव जानकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले
यावेळी कुसमोड गावचे सरपंच शहाजी लेंगरे ,माजी सरपंच महावीर धायगुडे ,माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र आबा ठवरे ,पिलीव येथील नागरी आघाडीचे अध्यक्ष आरिफखान पठाण, माजी सरपंच अमोल मदने ,राजेंद्र जामदार, उमेश सरवदे ,कुसमोडचे माजी सरपंच सिताराम धायगुडे, माजी सरपंच तानाजी शेंडगे,धनाजी वाघ ,मुगटराव धायगुडे, अर्जुन वाघ, पोपट कचरे ,बाळकृष्ण धायगुडे,पैलवान दत्ता मगर, अँड अजिनाथ वाघमोडे ,अज्ञान धायगुडे, पोपट शेंडगे, प्रा .सुग्रीव लेंगरे ,नबाजी मदने ,विजय मदने ,गणेश लेंगरे ,सुग्रीव मदने, शेखर कपने ,यांच्यासह धायगुडे ,कचरे ,शेंडगे वस्ती येथील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी कुसमोड ग्रामस्थांचयावतीने आमदार उत्तमराव जानकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला .
कुसमोड येथील पंढरपूर _ सातारा महामार्ग ते शेंडगे वस्ती _ धायगुडे वस्ती रस्त्याचे लोकार्पण करताना आमदार उत्तमराव जानकर, माजी सभापती मच्छिंद्र ठवरे ,सरपंच शहाजी लेंगरे व इतर मान्यवर.

























