पंढरपूर – येथील अध्यापक विद्यालयात सोमवारी (दि.१२) राजमाता जिजाऊ जयंती स्वामी विवेकानंद जयंती तसेच युवा दिन व हुतात्मा दिन मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.वाय.पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. आर.वाघमारे होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, सोलापूरचे चार हुतात्मे यांच्या जीवनावरती आधारित भित्तिपत्रके तयार केली होती त्याचे उद्घाटन करून झाली. पाहुण्यांचा परिचय स्नेहल कुलकर्णी यांनी करून दिला. दिव्या पिसे, प्रतीक्षा देशमुख, सार्थक इंगोले, गौरी दानोळे या छात्राध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या भाषणामध्ये मुलांना प्रोत्साहित केले व ध्येय ठरवा मार्ग ठरवा तो गाठेपर्यंत थकू नका, थांबू नका असा मोलाचा संदेश दिला. कार्यक्रमाचेअध्यक्ष डॉ.वाघमारे यांनी मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंदांचे विचार आचरणामध्ये आणण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री मोरे व गायत्री रणदिवे यांनी केले. फलक लेखन तृप्ती भगत व ज्ञानेश्वरी शिंदे यांनी केले. रांगोळी रचना कळकुंबे व शुभांगी चव्हाण तर भित्तिपत्रके हर्षा राहीरकर व प्रतीक्षा पवार यांनी तयार केले. कार्यक्रमाचे आभार नम्रता माळी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष गंगथडे यांनी मार्गदर्शन केले.अध्यापक विद्यालयाचे शिक्षक श्रीनिवास हरिदास, एच.डी.जाधव, मनोज पाडवी, अतुल शिखरे, अभिजीत अवताडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

















