Sunday, April 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जिजाऊ गुरुकुलमध्ये सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ माॅंसाहेब यांच्या जयंतीनिमित्त बहुआयामी उपक्रमांचे आयोजन

तरुण भारतbyतरुण भारत
January 13, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – जिजाऊ गुरुकुल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ माॅंसाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून शैक्षणिक, बौद्धिक, सांस्कृतिक व सामाजिक अशा विविध उपक्रमांचे प्रभावी आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यात आला.

या कार्यक्रमांतर्गत प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा तसेच वार्षिक क्रीडा महोत्सव अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली गुणवत्ता सिद्ध केली.

या सर्व उपक्रमांची सांगता राजमाता जिजाऊ माॅंसाहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाने करण्यात आली. यावेळी विविध नामांकित वक्त्यांना निमंत्रित करण्यात आले होते.

श्री. देवा चव्हाण यांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये “ऐकावं ते नवलच” या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधत जीवनातील सकारात्मक दृष्टिकोन, शिस्त आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व पटवून दिले.

ऍड. विक्रम सावळे यांनी विद्यार्थ्यांना ‘भविष्यातील करिअरच्या विविध संधी’, स्पर्धा परीक्षा आणि योग्य नियोजनाबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच सौ. कविता अंधारे व डॉ. तनुजा चिकणे यांनी राजमाता जिजाऊ माॅंसाहेब व आधुनिक जिजा यांच्यातील संवादाच्या माध्यमातून आजच्या समाजातील ज्वलंत विषयांवर प्रभावी प्रकाश टाकला.

या कार्यक्रमप्रसंगी विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जिजाऊ गुरुकुलच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे दर्शन घडविणाऱ्या वार्षिक कॅलेंडरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या थोर मातांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण ५५ रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या.

थोर महापुरुषांच्या जयंती केवळ औपचारिक न साजऱ्या करता सामाजिक बांधिलकी, प्रेरणा आणि मूल्यशिक्षणाच्या माध्यमातून कशा प्रकारे साजऱ्या कराव्यात याचे उत्तम उदाहरण जिजाऊ गुरुकुलने घालून दिल्याचे मत अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.

कार्यक्रमास रोटरी क्लब बार्शीचे अध्यक्ष श्री. संजय हिंगमिरे, उद्योगपती चिंतामणी अण्णा, हनुमंत मोरे, पालक-शिक्षक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष येमेश कुऱ्हाडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी गाडगे, सचिव सौ. वर्षाताई गाडगे, प्रशासकीय अधिकारी किशोर कदम, डायरेक्टर संदेश कदम, फिजिकल कोच जे. बी. शिंदे यांच्यासह शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनीषा मोठे आणि सौ. वैष्णवी क्षीरसागर यांनी केले.

Post Views: 62
Previous Post

श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त ६८ लिंग प्रदक्षिणा भाविकांना पी.बी. ग्रुपतर्फे दूध वाटप

Next Post

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह 

ताज्या बातम्या

विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये रोबोटिक्स व AI शिक्षण उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

April 26, 2026

भोकरदन मध्ये अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात आला

April 26, 2026

पारध येथे पोलिसांनी एकूण ७९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला .

April 26, 2026

ईटमध्ये राष्ट्रवादीचे देशमुख व भाजपाचे गिते या दोन गटात राडा

April 26, 2026

आदर्श विकास घडविणार पालकमंत्री गोरे

April 26, 2026

भावगंधित व्यक्तिमत्वे या ग्रंथास डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅदमी चा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

April 26, 2026

उषा कुलकर्णी यांचे दुःखद निधन

April 26, 2026

सांस्कृतिक सावल्या समीक्षण ग्रंथास प्रा. रसूल सोलापुरे संस्थेचे साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर

April 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0831753

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697