जेऊर – जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट ) कार्यकर्ता मेळावा आज दिनांक 12 जानेवारी रोजी नालबंद मंगल कार्यालय येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या मेळाव्यामध्ये एड.अजित विघ्ने,एड नितीन राजेभोसले, अण्णासाहेब पवार, सुजित तात्या बागल, रोहिदास सातव, दत्तात्रय अडसूळ दादासाहेब जाधव, विनय ननवरे, रवींद्र वळेकर या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा पवार ) गटाने संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढवावी असा नारा दिला.
कुर्डूवाडी नगर परिषदेमध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यश संपादन केलं तसेच यश मतदारांच्या विश्वासाच्या बळावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत निश्चितच मिळेल असा ठाम विश्वास या कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला.
यावेळी व्यासपीठावर सुभाष आबा गुळवे, तात्यासाहेब मस्कर ,चंद्रकांत सरडे, राजेंद्रकुमार बारकुंड, नवनाथ भांगे, एड. गिरंजे, विलास दादा पाटील, तानाजी झोळ,विलास राऊत ,अशोक पाटील विवेक येवले,पोपट सरडे, निळकंठ अभंग ,तात्यासाहेब जाधव ,चंद्रहास निमगिरे, सुहास रोकडे ,नानासाहेब निळ, उद्धव दादा माळी, एड. अजित विघ्ने, सुजित बागल, नानासाहेब लोकरे, नानासाहेब मोरे, प्रकाश थोरात, तात्या मामा सरडे, राजेंद्र धांडे ,डॉ. गोरख गुळवे, राजेंद्र बाबर, विनय ननवरे, आर.आर. बापू साखरे, अभिजीत पाटील, शंकर जाधव, सुदाम शेळके, अण्णासाहेब पवार, सुहास आबा साळुंखे, दत्तात्रय अडसूळ, राजाभाऊ देशमुख, सोमनाथ रोकडे, संदीप तळेकर, बाळासाहेब ढेरे ,मयूर पाटील, गौरव झांजुर्णे, गणेश गुंडगिरे, बाळासाहेब पाटील, उमेश इंगळे, महेश गंणगे, अनिल शेजाळ, रवींद्र वळेकर, अशोक तकिक, प्रमोद बदे, रोहिदास सातव, विकास गोंदकर, युवराज गपाट, राहुल कुकडे आदी मान्यवर उपस्थित होते.


















