बार्शी – कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी येथे आज दि. १२ जानेवारी रोजी रक्तदान शिबीर संपन्न झाले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सचिव श्री. पी.टी पाटील यांच्या शुभहस्ते व प्राचार्य डॉ. दीपक गुंड यांच्या उपस्थिती संपन्न झाले.
या वेळेला पी.टी पाटील यांनी मार्गदर्शन करताना रक्तदानाचे महत्त्व विशद केले. त्याचबरोबर कॉलेजच्या यशाचे कौतुक केले. नेहमीच अध्यापक विद्यालयामध्ये उत्स्फूर्तपणे विद्यार्थी रक्तदान करतात हे सांगितले. अध्यापक विद्यालयाचे एकूण ७२ माजी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन वेगवेगळ्या ठिकाणी उत्कृष्ट प्रकारचे काम करीत आहेत, त्याबद्दल सर्वांचे कौतुक केले.
या शिबिरामध्ये प्रथम व द्वितीय वर्षातील छत्राध्यापकाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला यामध्ये मुली एकूण ११ व मुले १२ असे एकूण २३ जणांनी रक्तदान केले. कर्मचाऱ्यांमध्ये प्राचार्य डॉ.दीपक गुंड, प्रा. डॉ.चंद्रकांत उलभगत, प्रा. डॉ. रमेश साबळे व सुनील शिंदे यांनी रक्तदान केले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ.चंद्रकांत उलभगत यांनी केले.

















