टेंभुर्णी – इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) टेंभुर्णी शाखेच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या सोहळ्यात अध्यक्षपदी डॉ. मदन कांबळे, उपाध्यक्षपदी डॉ. उमेश झाडबुके, सचिवपदी डॉ. अमित चोपडे, खजिनदारपदी डॉ. सुहास अनंतवळस तर सहसचिवपदी डॉ. राहुल पाटील यांची निवड करण्यात आली.
या निवडी इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. कार्यक्रमास इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष डॉ. ज्योती चिडगुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.
यावेळी डॉ. एम. के. इनामदार, महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. किरण सारडा, माजी अध्यक्ष डॉ. दादासाहेब माने यांची उपस्थिती होती. तसेच राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई यांनी शाखेस भेट देऊन नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
या पदग्रहण सोहळ्यास अकलूज, इंदापूर, कुर्डूवाडी व टेंभुर्णी येथील विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























