बार्शी – तालुक्यातील उपळे दुमाला येथील वखारिया विद्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती सोमवार दि. १२ जानेवारी रोजी सकाळी साजरी करण्यात आली.
विद्यालयातील शिक्षक शंकर शिंदे यांच्या हस्ते कर्मवीर मामासाहेब जगदाळे, राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी इयत्ता पाचवीतील कु. ईश्वरी नाईकवाडी, कु.प्रांजली या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात संस्थांर्गत विज्ञान प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या साहित्यास तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या कु. राधिका पवार व कु. कार्तिकी बुरगुटे या विद्यार्थिनींचा आणि मार्गदर्शक शिक्षक मकरंद जगदाळे, रेवणसिद्ध दुलंगे यांचा शंकर शिंदे यांनी प्रमाणपत्र, गुलाब पुष्प देवून सत्कार केला. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक प्रशांत काशीद, डी.डी. राऊत, अनिल वैद्य, एन.एन महाले, दादासाहेब धनके, सेवक वाघ, सुरवसे उपस्थित होते.

















