सोलापूर – अखिल भारतीय आंतर विद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विनीत दिनकर याने 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये पाचवे स्थान प्राप्त केले. या कामगिरीवर तो खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
खेलो इंडियासाठी पात्र होणारा हा दुसरा विद्यार्थी आहे. अल्वाज एज्युकेशन शिक्षण संस्था मोंडबिंद्री कर्नाटक येथे सुरू असलेल्या स्पर्धेत सलामीच्या दिवशी दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत दाजी हुबळे याने आठवे स्थान प्राप्त करीत तो खेलो इंडिया स्पर्धेसाठी स्थान निश्चित केले होते.


















