माळशिरस – शिवरत्न बंगला येथून निघालेल्या कै.शंकरराव मोहिते पाटील यांच्या ज्योतीचे व प्रतिमेचे माळशिरस शहरात स्वागत करण्यात आला.
कै.शंकरराव मोहिते पाटील यांची ज्योत व प्रतिमा सदाशिवनगर कारखाना येथे नेण्याची परंपरा अनेक वर्षांपासून असून आज शिवरत्न बंगला येथून दुपारी निघालेल्या ज्योतीचे व प्रतिमेचे स्वागत माळशिरस येथील गणेश चौकात रामदास काळे, अमीर पठाण यांनी केले.
यानंतर गोपाळराव देव प्रशालेजवळ कारखान्याचे व्हाइस चेअरमन मिलिंद कुलकर्णी,संचालक सुरेश पाटील, एम. पी.कुलकर्णी,रामभाऊ दोशी,संतोष कुलकर्णी,धोंडीराम मस्के,नंदकुमार घाडगे,धनंजय केसकर,नितीन थिटे,रामचंद्र शेंडगे,शिवाजी कोळेकर,जानकर,यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वागत केले. त्यानंतर ज्योत सदाशिवनगर कडे मार्गस्थ झाली
















