पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील वृतपञ विक्रेते संजय अनंत रोकडे यांची पिलीव पञकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चैतन्य पतसंस्थेचयावतीने त्यांचा चेअरमन नानासाहेब देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी नागरी आघाडीचे अध्यक्ष आरिफखान पठाण, उपाध्यक्ष डॉ मिलिंद गुळभिले, संचालक तुकाराम पडळकर, कल्याण जावळे, कुमार भैस, अशोक राजमाने ,पतसंस्थेचे सचिव रघुनाथ नरळे, दामोदर लोखंडे ,विठ्ठल जाधव, गणेश ढेकळे यावेळेस उपस्थित होते .संजय रोकडे यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
संजय रोकडे यांचा सत्कार करताना चेअरमन नानासाहेब देशमुख, आरिफखान पठाण, तुकाराम पडळकर सर ,डॉक्टर मिलिंद गुळभिले व इतर मान्यवर.


















