सांगोला – अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धे करता सांगोल्यातील वाघमारे कराटे क्लासचे आशिष कोकरे, सुरज पांढरे, मयंक स्वामी या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
स्पोर्ट्स कराटे डू असोसिएशन, सोलापूर यांच्यामार्फत ही निवड करण्यात आली आहे. त्यांना श्रावणी वाघमारे, निजेंद्र चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे स्पोर्ट्स कराटे डू असोसिएशन, सोलापूरचे अध्यक्ष जी.के.वाघमारे, कराटे डू असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव संदीप गाडे, संदीप वाघचौरे, सुनील वाघमारे यांनी अभिनंदन केले.

















