अक्कलकोट – एका चिमुकल्या बहिणीने देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या वीर जवान अवधूत नागणे यांना राखी पाठविले होते. या राखीचा धागा पकडून भारतीय सेना दिनी ‘ कु.अनन्या शिवाजी कांबळे या चिमुकल्या बहिणीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘वीर जवान शाळेत भेट दिली.या भेटी दरम्यान विर जवनाचा मोठ्या उत्साहात स्वागत व सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दुधनी येथे शाळेतील उपक्रमांतर्गत विद्यार्थिनी कु. अनन्या शिवाजी कांबळे हिने देशरक्षकांसाठी राखी पाठवली होती. ही राखी वीर जवान अवधूत नागणे यांना कर्तव्यावर असताना मिळाली. एका बहिणीचे प्रेम आणि पत्रातील शुभेच्छांनी भारावलेल्या या सैनिकाने सुट्टीवर आल्यावर थेट शाळा गाठली. अनन्याला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देत त्यांनी ‘भाऊ-बहिणीचे’ नाते अधिक घट्ट केले. नागणे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना पत्राचे वाचन केले, तेव्हा उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले.
या कार्यक्रमात दुधनी नगरपरिषदेचे नूतन नगरसेवक म. रफिक निंबाळकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी नगरसेवक निंबाळकर बोलताना म्हणाले की,जवानांचे जीवन, जवानांच्या त्याग त्यांचे कठोर प्रशिक्षण आणि देशासाठी असलेले सर्वोच्च बलिदान हे समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी असल्याचे सांगितले. यावेळी “सैनिक आपल्या कुटुंबापेक्षा देशाला प्राधान्य देतो.
आजचा हा सोहळा आमच्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची बीजं पेरण्यासाठी ऊर्जा देणारा ठरेल.” असे यांनी सांगितले.यावेळी कार्यक्रमाचे समन्वयक पोमू राठोड,महिदिमिया जिडगे, रविकुमार कोरचगाव आणि श्रीशैल मलगण यांनीही सैनिकांच्या गौरवास्पद कामगिरीवर प्रकाश टाकला.या सोहळ्याला अल्लाउद्दीन झळकी, श्रीम. शोभा म्हेत्रे, कु. मंदाकिनी सोनकांबळे यांच्यासह ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















