वेळापूर – सांगोला वेळापूर रोडवरील निरा कालव्या रोड औवताडे वस्ती फळवणी जवळ १५ ते २० जणांच्या जमावावर दुधाचा टँकर गेल्याने अपघात होऊन यामध्ये दहा जण गंभीर जखमी झाले होते.
यामध्ये किसन चंद्रकांत सूर्यवंशी राहणार भिगवन तालुका इंदापूर व चेतन विलास पवार राहणार आसू तालुका फलटण जिल्हा सातारा या २ जणांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला होता.
या आपघातामध्ये फळवणी अवताडे वस्ती येथील हनुमंत अवताडे यांच्याही डोक्याला जबर मार लागला होता त्यांना पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांचे उपचारादरम्यान १६ जानेवारी रोजी मृत्यू झाला.
या अपघातामध्ये आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले ९ ते १० जणांवर अकलूज, पंढरपूर, सोलापूर येथे उपचार सुरू आहेत.



















