सोलापूर – महानगरपालिकेच्या एकूण २६ प्रभागातील १०२ जागांसाठी दि.१५ जानेवारी रोजी मतदान झाले. तर १६ जानेवारीला मतमोजणी संपन्न झाली. या मतमोजणीत शहरातील प्रभाग क्रमांक १० ते १३ मध्ये भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण पॅनल दणदणीत विजयी झाले आहे. सकाळी दहा वाजता सुरू झालेली मतमोजणी दुपारी दोन पर्यंत पूर्ण झाली.
प्रभाग पद्धतीच्या अ ब क ड प्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांनी प्रभाग क्रमांक १० ते १३ मधील उमेदवार विजय झाल्याचे घोषित केले. एकूण १६ उमेदवार विजयी झाल्यानंतर मतमोजणी केंद्र बाहेर विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून एक जल्लोष केला. सुनील कामाठी यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत गुलाल उधळला. कामाठी यांचे पोस्टर घेऊन कारवर चढून घोषणा दिल्या. ओपन जिप्सी मधून मिरवणूक काढून फटाक्यांची आतिषबाजी केली.
दरम्यान, प्रभाग क्रमांक १० मध्ये स्व. महेश कोठे यांचे सुपुत्र प्रथमेश कोठे तसेच त्यांच्या संपूर्ण पॅनलचा विजय झाला. येथे एक अपक्ष जिंकून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु मतदारांनी त्या अशा फोल ठरवल्या. त्यासह ईतर प्रभाग ११, १२ आणि १३ यामध्ये देखील आ. देवेंद्र कोठे समर्थक पॅनलचा सुमारे ४ ते १३ हजाराच्या मताधिक्यांनी विजय झाला. यावेळी भाजपच्या विजयी उमेदवारांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आमदार देवेंद्र कोठे आणि जनतेचे आभार मानत सोलापूरच्या विकासासाठी महापालिकेत कार्य करणार असल्याचे सांगितले.
चौकट
प्रभाग क्रमांक १० ते १३ विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक १०
अ. उज्वला दासरी – १५,२५५
ब.दिपीका येलदंडी – १३,५३३
क.सतीश सिरसील्ला – १०,५५३
ड.प्रथमेश कोठे – १४,८८१
प्रभाग क्रमांक ११
अ.युवराज सरवदे – ८,५६१
ब. शारदा रामपुरे – ८,६०२
क. मीनाक्षी कडगंची – ११,४२४
ड. अजय पोन्नम – ९,८६७
प्रभाग क्रमांक १२
अ.विनायक कोड्याल – १६,३८१
ब.सारिका खरजुगी – १४,८२८
क.अर्चना वडनाल – १५,४२१
ड.सिध्देश्वर कमटम – १३,०३९
प्रभाग क्रमांक १३
अ.सुनिता कामाठी – ११,४५६
ब.अंबिका चौगुले – ९,३८२
क. सत्यनारायण गुर्रम – १०,२७०
ड.विजय चिप्पा – ९,२६२


























