कुर्डूवाडी – नगरपालिकेच्या बैठकीमध्ये उपनगराध्यक्ष म्हणून राष्टृवादी काँग्रेसच्या सविता सुभाष जगताप यांंची बिनविरोध निवड करण्यात आली. तर स्विकृत सदस्य म्हणून राष्टृवादीचे वसिम मुलाणी व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय डीकोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
@ आज कुर्डूवाडी नगरपालिकेची बैठक कै.काशिनाथ भिसे सभाग्रहात नगराध्यक्षा जयश्री भिसे यांच्या अध्यक्षतेखाली संपंन्न झाली.प्रथमता सभाग्रहामध्ये राष्टृवादी काँग्रेसचे तरूण नेतृत्व बबलू कांबळे यांचे दुखद निधन झाल्यामुळे त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येवून कामकाजाला सुरवात करण्यात आली.अर्ज भरण्यासाठी दुपारी बारा ते एक वेळ देण्यात आला होता.यावेळेस उपनगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज सविता सुभाष जगताप यांचा आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपनगराध्यक्ष बापूसाहेब जगताप यांच्या घरात सविता जगताप यांच्या रूपामे चौथ्यांदा उपनगराध्यक्षपद मीळाले आहे.
स्विकृृत सदस्य म्हणून शिवसेनेकडून शिवसेना जिल्हाध्यक्ष धनंजय डिकोळे यांचा एकच अर्ज भरण्यात आला तर राष्टृवादी काँग्रेस कडून नितीन पवार व वसिम मुलाणी यांचे अर्ज आल्याने गटनेते समिर मुलाणी यांनी पत्राद्वारे पिठासन अधिकारी सचिन तापसे यांना वसिम मुलाणी यांचे नाव फायनल केले असल्याचे कळवले.पिठासन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी सचिन तापसे यांनी काम पाहीले तर सभेचे संपुर्ण विषयाचे वाचन बापू चोभे व रणजित शिंगारे यांनी केले.

























