पिलीव – माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील अनेकांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पंचायतराज मंञी तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंञी जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली व माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार राम सातपुते, माळशिरस मंडल अध्यक्ष नितीन मोहीते ,पिलीव भाजपा शहराध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत गोविंद माळी ,गोपाळ माळी ,सुभाष जाधव, किसन जाधव, संतोष जाधव, सदाशिव माळी ,सतीश जाधव, पोपट काळभोर, मोतीराम पवार, विवेकानंद माळी,मनोज माळी ,महेश माळी, नीलेश माळी ,नवनाथ माळी, ज्ञानेश्वर मगर, तानाजी मोरे, किरण जाधव, स्वप्नील जाधव, सुशांत जाधव, उमेश जाधव, प्रसाद जाधव यांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला .
यावेळी प्रवेशानंतर बोलताना गोपाळ माळी यांनी सध्या देशात व राज्यात भाजपप्रणीत सरकार सत्तेत असुन विकासासाठी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत मंञी जयकुमार गोरे व माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार राम सातपुते यांच्यावर विश्वास ठेवुन आम्ही भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
माळशिरस तालुक्यात सध्या पालकमंञी जयकुमार गोरे व माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार राम सातपुते यांच्या काम करण्याच्या व अडी अडचणी ,विकास कामे करीत असल्यामुळेच तालुक्यातील अनेक गावातील विविध पक्षांतील नागरिक,पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. _. संजय पाटील, चिटणीस, भाजपा माळशिरस मंडल.
माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार राम सातपुते, मंडल अध्यक्ष नितीन मोहीते ,पिलीवचे शहराध्यक्ष शहराध्यक्ष प्रमोद भैस यांच्या उपस्थितीत कुसमोड येथील नागरिकांचा भाजपमध्ये प्रवेश.




















