माळीनगर – रोटरी क्लब ऑफ अकलूज, एच. व्ही. देसाई हॉस्पिटल मोहम्मद वाडी पुणे, आणि गट नंबर दोन येथील रुक्मिणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत नेतृत्व तपासणी मोफत मोतीबिंदू, शस्त्र क्रिया आणि मधुमेह तपासणी शिबिरांमध्ये २५२ रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन अकलूज ब्लड बँकेचे अध्यक्ष डॉ. संजय सीद यांचे हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी माळशिरस तालुका निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. अमोल शेंडगे, प्रमुख उपस्थिती तालुका होमिओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभिजीत राजे भोसले यांची होती. त्यांच्यासह व्यासपीठावर रोटरीचे अध्यक्ष केतन बोरावके, रुक्मिणी हॉस्पिटलचे डॉ. अविनाश बोरावके, डॉ. शहा, रोटरीचे सचिव अजिंक्य जाधव उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.प्रास्तविक केतन बोरावके यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबिराचे प्रकल्प अधिकारी कल्पेश पांढरे यांनी केले. रुक्मिणी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अविनाश जाधव व मुलगा डॉ . निसर्ग जाधव यांनी शिबिरासाठी हॉस्पिटल उपलब्ध करून दिले. कार्यक्रमास डॉ. संजय जाधव, डॉ. विजयकुमार कोकाटे, डॉ. सत्यजित गिरमे,रोटरियन अजित वीर,सासवड माळी शुगर फॅक्टरी चे माजी मॅनेजिंग डायरेक्टर प्रदीप जाधव, संचालक निळकंठ भोंगळे उपस्थित होते.आभार रोटरी सचिव अजिंक्य जाधव यांनी मानले.
एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय मोहम्मद वाडी पुणे यांच्याकडून डॉ आशिष चौधरी,डॉ सलीम तांबोळी, सागर कोळेकर, सुभाष सोरटे
यांनी शिबिरात रुग्णांचे डोळे, मधुमेह व मोतीबिंदू तपासणी केली.
या शिबिरात २५२ लाभार्थ्यांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला. त्यापैकी ६५ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची तातडीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. तसेच १९० लाभार्थी मधुमेह तपासणीत आढळले.
या संपूर्ण शिबिरासाठी राजन राऊत यांचे सहकार्य लाभले.
मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जे ६५ रुग्ण आढळून आले. त्यांना बुधवार दिनांक २१ रोजी पुणे येथे नेऊन मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून रूग्णांना घरी आणून सोडले जाणार आहे.
एच. व्ही. देसाई हॉस्पिटल मोहम्मदवाडी पुणे यांच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ अकलूज यांनी आयोजित केलेल्या मोफत नेत्र, मोतीबिंदू तपासणी शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.


















