सोलापूर – महाराष्ट्राचे शालेय १४ वर्षाखालील मुलींचे कबड्डी संघ सुवर्णपदक पटकावतील, असा विश्वास जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी व्यक्त केला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर पार्क स्टेडियमवर झालेल्या शालेय १४ वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धापूर्व शिबीराचा सांगता समारोप समारंभ त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रीय स्पर्धा या गुडीवाडा, आंध्रप्रदेश या ठिकाणी दि. १८ ते २३ जानेवरी दरम्यान संपन्न होणार आहेत. त्यात भाग घेण्यासाठी हा संघ रवाना झाला. या संघांचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर १३ ते १७ जानेवारी दरम्यान झाले.
या शिबीराच्या सांगता समारोपप्रसंगी प्रमुख जिल्हा नियोजन अधिकारी श्री. पवार यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी सहाय्यक नियोजन अधिकारी श्रीकांत कुंडला, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव चंद्रकांत रेंम्बुर्सू, मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्तात्रय वरकड, निवृत्त तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, तालुका क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे, महाराष्ट्र संघाचे संघव्यवस्थापक संतोष जाधव, प्रशिक्षक सायली जाधव आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे संघ: ईशिका अण्णासाहेब बवले, ज्ञानेश्वरी विक्रम बवले, आराध्या योगेश दौंडकर, समृदृधी संतोष झगडे (पुणे ), भैरवी रत्नदीप इंगवले (सातारा), शर्वरी सचिन पाटील ( वाशिम), अमृता विजय पाटील (ठाणे), सीमा लतिफ शेख (लातूर ) , राधिका कमलेश्वर अकिंगे (नाशिक), संस्कृती दिपक माने (सोलापूर), कृष्णा हरीओम वर्मा (नाशिक), पायल अनिल आढे (परभणी).



















