Wednesday, March 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वाहने लुटणारे दोन सराईत आरोपीना स्थानिक गुन्हेशाखेने ठोकल्या बेड्या

तरुण भारतbyतरुण भारत
January 22, 2026
in crime
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव – ट्रक चालक रामजी शोभनाथ यादव हे सोलापूर–धुळे महामार्गावरून कंटेनरमधून नवीन टायर वाहतूक करत असताना तेरखेडा परिसरातील लक्ष्मी पारधी पिढी जवळ त्यांच्या कंटेनरमधील टायरची चोरी करण्यात आली होती. या घटनेमुळे महामार्गावरील मालवाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव, श्री. विनोद इज्जपवार यांनी पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने दि. २१ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना गुप्त माहिती मिळाली की अनिल मच्छींद्र पवार (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) याने त्याच्या साथीदारांसह हायवेवरील कंटेनरमधून नवीन टायरची चोरी केली असून, ते टायर तसेच चोरीच्या मोटारसायकली लक्ष्मी पारधी पिढीच्या पाठीमागील जंगल परिसरात लपवून ठेवण्यात आल्या आहेत. तसेच आरोपी तेरखेडा गावात येणार असून त्याच्याकडील मोटारसायकलही चोरीची असल्याची माहिती मिळाली.

पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली असता संशयित इसम पथकास पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या इसमालाही अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी आपली नावे अनिल मच्छींद्र पवार (वय ३४, रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) आणि नाना तानाजी शिंदे (वय २७, रा. भिकारसारोळा, ता. जि. धाराशिव) अशी सांगितली.


प्राथमिक चौकशीत आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी इतर दोन साथीदारांसह मिळून हायवेवरून जाणाऱ्या कंटेनरमधून नवीन टायरची चोरी केल्याची तसेच पानगाव परिसरात चोरी केल्याची कबुली दिली. याशिवाय वाशी, बेंबळी, येरमाळा आणि भादा पोलीस ठाणे हद्दीतून मोटारसायकली चोरून त्या लक्ष्मी पारधी पिढीच्या पाठीमागील जंगल परिसरात लपवून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन झडती घेतली असता २९ नवीन टायर, ४ चोरीच्या मोटारसायकली, गुन्ह्यातील रोख रक्कम तसेच गुन्हा करताना वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण ८,२८,६५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक श्री. सचिन खटक, पोलीस हवालदार नितीन जाधवर, बबन जाधवर, चापो. महबुब अरब आणि रोहित दंडनाईक यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे महामार्गावरील चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Post Views: 130
Previous Post

Next Post

जिल्हा परिषद साठी ६८ तर पंचायत समिती साठी ९५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जिल्हा परिषद साठी ६८ तर पंचायत समिती साठी ९५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

ताज्या बातम्या

दोन दिवसात विविध वस्तू , साहित्याच्या विक्रीतून ३.५० लाखांची उलाढाल

दोन दिवसात विविध वस्तू , साहित्याच्या विक्रीतून ३.५० लाखांची उलाढाल

March 11, 2026
शॉकसर्किटने आग; लाखांचे नुकसान 

शॉकसर्किटने आग; लाखांचे नुकसान 

March 11, 2026
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी विकास कस्तुरे

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी विकास कस्तुरे

March 11, 2026
20 एमएलडी क्षमतेच्या मल निसारण केंद्राची उभारणी अंतिम टप्प्यात

20 एमएलडी क्षमतेच्या मल निसारण केंद्राची उभारणी अंतिम टप्प्यात

March 11, 2026
मार्कंडेय प्रशालेत महिला दिन व वार्षिक पारितोषिक वितरण  थाटात संपन्न

मार्कंडेय प्रशालेत महिला दिन व वार्षिक पारितोषिक वितरण  थाटात संपन्न

March 11, 2026
बुद्धिबळ स्पर्धा : सोलापूरचा सौरव साहू व रत्नागिरीची मयुरी तावडे विजेते

बुद्धिबळ स्पर्धा : सोलापूरचा सौरव साहू व रत्नागिरीची मयुरी तावडे विजेते

March 11, 2026

अबब ! उन्हाचा पारा वाढला.. #hightemperature #temperature #viral #tranding #popular

March 11, 2026

मनपाच्या महिला महोत्सवात ४० बचत गटांचा सहभाग. #public #marathinews #viral

March 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0724150

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697