पंढरपूर – येथील अध्यापक विद्यालयांमध्ये क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशिक्षण संस्था वेळापूर येथील ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रमुख पाहुण्या म्हणून क्रांती कुलकर्णी या उपस्थित होत्या.
यावेळी त्यांनी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.आर. वाघमारे उपस्थित होते. या क्रीडा स्पर्धा पुढील सात दिवस चालणार असून यामध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धा निकोप आणि दर्जेदार, खिलाडी वृत्तीने व्हाव्यात असे मुलांना आवाहन केले. शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायाम आणि खेळाचे महत्व त्यांनी पटवून सांगितले. याचवेळी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाघमारे यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या .
यानंतर प्रमुख पाहुण्या सौ. कुलकर्णी यांनी स्पर्धेसाठी नाणेफेक करून पहिला सामना खो-खो या खेळाचा खेळाला गेला. यासाठी सुरुवात करून दिली. या स्पर्धा दरवर्षी विद्यालयात मोठ्या उत्साहाने पार पडत असतात. यासाठी संस्थेचे मानद सचिव एस. आर. पटवर्धन, सदस्य एस.पी.कुलकर्णी यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभते. याप्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
















