पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पवित्र विवाह सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. या भाविकांसाठी भोजन व्यवस्थेच्या दृष्टीने पुणे येथील प्रकाश नारायण कोरडे व सौ. राणी प्रकाश कोरडे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस एक लाख रुपयांची देणगी दिली आहे.
सदर देणगी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्याच्या काळात येणाऱ्या भाविकांना भोजन व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे.
या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समिती सदस्या ॲड. माधवी निगडे यांच्या हस्ते देणगीदारांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती व उपरणे देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
















