सोलापूर – अक्कलकोट सोलापूर महामार्गावर विरूध्द दिशेने येणाऱ्या कंटेनरच्या धडकेत एक इंजिनिअर तरूण ठार झाला आहे तर दुसरा बीकॉमचे शिक्षण घेतलेला तरूण जखमी झाला आहे. शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची एकच गर्दी झाली आहे.विनीत श्रीनिवास पोरंटला रा. सोलापूर या इंजिनिअर तरुणाचा मृत्यू झाला आहे तर पवन मधुकर नामपल्ली वय २३ हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. हे दोघे एका दुचाकीवरून कुंभारीकडे जाताना गुरूवारी 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
पवन आणि विनीत हे दुचाकीवरून अक्कलकोटच्या दिशेने जात होते. तेव्हा तेथे एक खुले कंटेनर तेथील एका शोरुम मधून आडवा आला.दुचाकीचा वेग अधिक असल्याने नियंत्रण सुटले ,व कंटेनरला जाऊन धडकले. कंटेनरच्या मधोमध धडकून मृत्यू- कंटेनर चालकाने कंटेनर मागे घेत असताना दुचाकीवर आलेल्या विनीत व पवन हे अतिशय वेगात येत थेट कंटेनरच्या मधोमध धडकले. हा अपघात इतका गंभीर होता की, दुचाकी थेट कंटेनरच्या मध्येच अडकली. दुचाकीवरील दोघे जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेतखाली पडले. यात दोघेही बेशुध्द झाले.अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
घटनेची माहिती वळसंग पोलिस ठाण्याला देण्यात आली नवीन घरकुल चौकी मधील पीएसआय उस्मान शेख, एएसआय श्रीनिवास दासरी, पीसी धरेप्पा होनमुरे, सुनील राठोड हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ताबडतोब लगेच रुग्णवाहिकेला बोलवले. सामाजिक कार्यकर्ते जहांगीर शेख उर्फ लादेन यांनी जखमी झालेल्या दोघांना बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी विनीत याला मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच दोघांचे नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती.