सोलापूर – भारत सरकारने महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना पद्मभूषण पदवी बहाल करणे म्हणजे राष्ट्रीय महापुरुषांचा अपमान आहे असे वादग्रस्त व राष्ट्रीय महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भगतसिंग कोशियारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करणे म्हणजे निषेधार्थ असून याबाबत केंद्रातील भाजपा रुपी मोदी सरकारचा जनविकास क्रांतीसेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी जाहीर निषेध करण्यात येत आहे.
भगतसिंग कोशियारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल असताना महाराष्ट्राचा जाणते राजा छत्रपती शिवाजी महाराज, अस्पृश्यांना न्याय मिळवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले, स्ञी शिक्षणाची मुहूर्तमेढ करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक राष्ट्रीय महापुरुषांचे जाणीवपूर्वक अपमान भगतसिंग कोशियारी यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर लोकशाहीला काळीमा फासणारे अनेक लोकशाही विरोधी निर्णय आणि भल्या पहाटे मुख्यमंत्री पदाची शपथ देणे समाजातील प्रतिष्ठित कलावंत व विविध क्षेत्रात नावाजलेल्या बारा आमदारांना नियुक्ती करण्यास विलंब असे इतर अनेक असंविधानिक कृत्य संविधानिक पदावर राहून कोशियारी यांनी केल्याचे सर्व स्त्रोत आहे. अशा राष्ट्रद्रोही माणसाला पद्मभूषण पुरस्कार प्रदान करून मोदी सरकारने आपल्या अकलेचे दिवाळे काढून देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत. या कृत्याबद्दलही भाजपा रुपी मोदी सरकारचा जाहीर निषेध विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी केला आहे.
अशा कोशियारीचा पद्मभूषण पुरस्कार रद्द करावा अशी ही मागणी करीत असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.























