सोलापूर – पत्रा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पत्रा येथील ७ नंबर शाळेत बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत उत्सव अध्यक्षपदी गिरी माळी तर सचिवपदी सुमित जानगवळी यांची एकमताने निवड करण्यात आली.
बैठकीच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाबद्दल उपस्थितांनी शोक व्यक्त करत दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली वाहून बैठकीस सुरुवात करण्यात आली. ही बैठक माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना शिवजन्मोत्सव शिस्तबद्ध, सांस्कृतिक व समाजोपयोगी उपक्रमांतून साजरा करण्याचे आवाहन केले. शिवजन्मोत्सवात पारंपरिक वाद्ये, लेझीम व ढोल-ताशांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्याचप्रमाणे तरुणांच्या सहभागातून उत्सव अधिक लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात आला आहे.
यावेळी जयंत शेळके, सचिन शिंदे, आनंद कोलारकर, वैभव गंगणे, राहुल बनसोडे, निशांत सावळे, लोकेश इरकशेट्टी, आदित्य घाडगे, विजय कांबळे, सचिन स्वामी, देविदास घुले यांच्यासह पत्रा तालीम मंडळाचे सर्वच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नूतन पदाधिकाऱ्यांच्या करण्यात आल्या निवडी
उपाध्यक्ष : प्रज्वल काळे / चैतन्य भगत
खजिनदार : तुषार गायकवाड
कार्याध्यक्ष : ओंकार कदम
मिरवणूक प्रमुख : अजिंक्य शिंदे, सुहास चाबूकस्वार, सुरज पाटील
लेझीम प्रमुख : महेश जगदाळे, अनिकेत बनसोडे
प्रसिद्धी प्रमुख : ओम कदम, जन्मजय भोसले
























