Sunday, April 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आमच्यावर बोलायला पालकमंत्र्यांना यावं लागतंय – भगीरथ भालके

तरुण भारतbyतरुण भारत
February 3, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आले आहेत. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवारामध्ये विभागणी झाली होती. परिवाराचे तीन विभाग पडले होते. त्यामधील माढ्याचे आ.अभिजीत पाटील आणि विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांचे वेगवेगळे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. ही बाब पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना पचनी पडत नव्हती. वरील दोघांनी युती करून निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यातून धरला जाऊ लागला होता.

यामुळे त्यांनी युती करण्यात आली असल्याचे जाहीर करून टाकले होते. त्या युतीचे रूपांतर पाठिंबा देण्यापर्यंत गेले आहे. वाखरी जिल्हा परिषद गटातील उमेदवार हे आ.अभिजीत पाटील यांच्या गटाचे आहेत. या उमेदवारांना भालके गटाचे उमेदवार संग्राम गायकवाड यांनी भंडीशेगाव येथील सभेमध्ये उपस्थित राहून पाठिंबा व्यक्त केला आहे. त्यामुळे उमेदवार मयुरी बागल यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला आहे.

भंडीशेगाव येथे संयुक्त प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विठ्ठलची माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी थेट सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्यावर आग पाकड करीत त्यांच्या राजकीय कटकारस्थानाचा पाढा उपस्थित विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्यासमोर मांडला. केवळ विठ्ठल परिवाराच्या नावाखाली एकत्रित येण्याची भाषा बोलायची आणि वेळ आल्यानंतर वेगळी भूमिका घ्यायची हेच त्यांनी अनेक वेळा केल्याचे आपणास पहावयास मिळाले आहे.

स्वर्गीय भारत नानांच्या निधनानंतर आम्ही आपणाला वडीलधारी या नात्याने कायम सन्मान देत आलो होतो. मात्र आपण ठरलेली भूमिका न स्वीकारता कायम वेगळी भूमिका घेऊन मला अडचणीत आणण्याचा मोठा प्रयत्न केला असल्याचे जाहीर केले आहे. गळ्यात घड्याळाचा पंचा घालायचा आणि उमेदवारी फॉर्म मात्र कमळाचा भरायचा. असला डाव खेळायला नको होता. असेही भगीरथ भालके यांनी यावेळी सांगितले.

ज्या सरकारने घरकुल धारकांना ५०हजार रुपयाची जादा अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचबरोबर प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचे आश्वासन हे दिले होते त्या आश्वासनाचे नेमके काय झाले? असा सवाल ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके यांनी सरकारला स्पष्टपणे विचारला आहे. 

याप्रचार सभेमध्ये माढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना सांगितले की, वाखरी जिल्हा परिषद गट हा हॉटस्पॉट आणि चर्चेतील आहे. या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक होते. मात्र घड्याळाचा पंचा गळ्यात घालून कमळ घेतलं. असाही एक प्रकार पहावयास मिळाला आणि या ठिकाणी असलेल्या यलमर यांच्यावर अन्याय झाला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. परंतु हल्ली आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र कोणत्याही गल्लीबोळात फिरून या निवडणुकांमध्ये ही लक्ष घालत आहेत. यामुळे आमच्यासाठी पालकमंत्र्यांना यावं लागतं हीच आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. असे सांगत निधी मिळणार नसल्याची भीती दाखवली जात आहे. त्यामुळे पालकमंत्री साहेब आपण जरा सबुरीने घ्यावे असा सल्ला ही आमदार अभिजीत पाटील यांनी यावेळी दिला. आम्ही तुमच्याकडे येत असताना स्वतःला उमेदवारी मागण्यासाठी येत नसून मतदारसंघातील लोकांच्या हिताची कामे आणि विकास निधीसाठी यत असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. मागील पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये गणामध्ये पराभूत झालेल्या समाधान काळे यांना आता गटाची उमेदवारी दिली आहे. असे उपयोजित पणे सांगत त्यांचा आपण या निवडणुकीतही नक्की पराभव करू असेही सांगितले आहे. संग्राम गायकवाड यांनी दिलेला पाठिंबा वाया न घालवता, त्यांचा येतोचित सन्मान केला जाईल असेही आवर्जून सांगितले. 

मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कल्याणराव काळे यांनी आमच्या विरोधात येऊन गल्लोगल्ली येऊन प्रचार केला .आम्ही प्रत्येकाची मूठ बांधण्याचा प्रयत्न करत होतो .परंतु कल्याणराव काळे यांनी प्रत्येक पक्षात दोन दोनदा जाण्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवली. त्यांना आता जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचे मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले.

यावेळी प्रा.तुकाराम मस्के, तानाजी बागल, दीपक पवार, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वर्षाराणी शिंदे, समाधान गाजरे ,दत्ता नागणे, सुधाकर सुरवसे, बाळासो बागल, रणजीत बागल, पार्थ सुरवसे आदींनी भाषणे केली. 

यावेळी पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक नागेश भोसले, पंचायत समितीचे माजी उपसभापती विष्णू भाऊ बागल, विठ्ठलचे माजी संचालक सूर्यकांत बागल, सुभाष गोडसे ,संग्राम गायकवाड, साहेबराव नागणे, हनुमंत बागल, चंद्रकांत पाटील, धनंजय काळे, विठ्ठलचे माजी संचालक बिभिषन पवार, विठ्ठल गाजरे यांचे सह विठ्ठल परिवारातील अनेक पदाधिकारी आणि वाखरी गटातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 44
Previous Post

मोफत इलेक्ट्रॉनिक्स कृत्रिम हात बसण्याच्या शिबिरात  शंभर नागरिकांनी घेतला लाभ

Next Post

अजितदादा हे खेळाला न्याय देणारे नेते होते –  महेश गादेकर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अजितदादा हे खेळाला न्याय देणारे नेते होते -  महेश गादेकर

ताज्या बातम्या

मध्य रेल्वेच्यावतीने रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती’ची बैठक संपन्न

मध्य रेल्वेच्यावतीने रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती’ची बैठक संपन्न

April 19, 2026
वारकरी संप्रदायाच्या वतीने लवांडेंच्या अटकेची मागणी

वारकरी संप्रदायाच्या वतीने लवांडेंच्या अटकेची मागणी

April 19, 2026
भिगवण रेल्वे स्थानकावर आरोग्य तपासणी शिबिर

भिगवण रेल्वे स्थानकावर आरोग्य तपासणी शिबिर

April 19, 2026
जागतिक वारसा दिनानिमित्त रेल्वेच्यावतीने प्रदर्शन आणि परिसंवादाचे आयोजन

जागतिक वारसा दिनानिमित्त रेल्वेच्यावतीने प्रदर्शन आणि परिसंवादाचे आयोजन

April 19, 2026
एकाच कुटुंबातील दोन कर्त्या पुरुषांचे निधन; परिसरात शोककळा

एकाच कुटुंबातील दोन कर्त्या पुरुषांचे निधन; परिसरात शोककळा

April 19, 2026
पोदारची CBSE बोर्डात दहावीचा शंभर टक्के निकाल लावण्याची परंपरा अबाधित

पोदारची CBSE बोर्डात दहावीचा शंभर टक्के निकाल लावण्याची परंपरा अबाधित

April 19, 2026
पी. बी. ग्रुपतर्फे ऐतिहासिक बैलगाडी मिरवणुकीचा देखावा

पी. बी. ग्रुपतर्फे ऐतिहासिक बैलगाडी मिरवणुकीचा देखावा

April 19, 2026
सहकार भारतीच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न – जिल्हा कार्यवाह ऋषीकेश कुलकर्णी

सहकार भारतीच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न – जिल्हा कार्यवाह ऋषीकेश कुलकर्णी

April 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0817431

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697