सोलापूर – राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष अजितदादा पवार हे किशोर गटाला प्रोत्साहन म्हणून राज्य अजिंक्यपद स्पर्धा आयोजन करण्यासाठी संबंधित जिल्हा संघटनेला आर्थिक सहाय्य करीत होते. त्यांच्यामुळे राष्ट्रीय खो-खोपटूंना विद्युत मंडळात व विविध जिल्हा क्रीडा कार्यालयात सेवा मिळाली आहे. खेळाला न्याय देणारे ते नेते होते, असे सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर बोलत होते.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या निधनानिमित्त हॉटेल सिटी पार्क येथे श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीकांत ढेपे, अजितकुमार संगवे, सदस्य रवींद्र नाशिककर यांनीही त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य मनोज संगावार, विजय तडसरे, गुलाम मुजावर, सुरेश खुर्द भोसले, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, सचिव उमाकांत गायकवाड, खजिनदार श्रीरंग बनसोडे, सहसचिव मोहन रजपूत, राजाराम शितोळे, सदस्य प्रिया पवार, सोनाली केत, अजित शिंदे, पुंडलिक कलखांबकर व शिवशंकर राठोड आदी उपस्थित होते.























