माळशिरस : मेडद ता.माळशिरस येथील ग्रामदैवत कालभैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिभावात संपन्न झाली. येथील ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा माघ पोर्णिमेला साजरी केली जाते .सोनारीच्या कालभैरवनाथाचे स्थान म्हणून व नवसाला पावणारा नाथ म्हणून या भैरवनाथावर भाविकांची मोठी श्रद्धा आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून डवरी समाज मोठ्या संखेने येतो.
आज सकाळी पहाटेमहाआरती झालेनतर श्री ची रथातून भव्य मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली .भैरवनाथाच चांगभल ,देवाच्या घोड्याच चांगभल या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता .या ग्रामदेवतास बोललेला नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.घरोघरी आपल्या दारात १० रुपया पासून ५०० रुपयांच्या नोटांचे हार घेऊन थांबले होते.
दरवर्षी 10 रु च्या नोटापासून पाचशे रुपयांचे नोटाचे हार रथावर भाविक बांधतात .प्रत्येक वर्षी रथावरील नोटांच्या हाराच्या माध्यमातून व मंदिरात रोख देणगी मधून लाखो रुपये देवस्थान ला जमा होतात..दोन दिवस यात्रेत आलेल्या खेळण्यामध्ये बसण्यासाठी मुलांनी मोठी गर्दी केली होती.
आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती .सकाळी सुरु झालेला रथोत्सव ग्राम प्रदक्षणा घालून सुमारे अडीच वाजता मंदिरात परत आला. दुपारी कुस्त्याच्या मैदानानंतर या यात्रेची सांगता होते.यात्रा काळात कसलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी माळशिरस पोलीस ठाण्याचे पो नि.विकास दिंडूरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

























