जेऊर – इरा पब्लिक स्कूल जेऊर मधील पाच विद्यार्थ्यांची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धा परीक्षेसाठी निवड झालेली आहे.
या मध्ये,वीरप्रताप सूर्यकांत चौधरी, वेदांत विशाल रोडे, सानवी मनोज गणगे, राजवीर प्रमोद पोळ, नेत्राली गणेश शिरसकर या पाच विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, त्याबद्दल त्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सौ. मुथा व सौ. वानरसे यांचे इरा पब्लिक स्कूल चे सचिव सुनिल अवसरे, मुख्याध्यापिका अवसरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
व पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा दिल्या.


























