माहूर – तालुक्यातील मौजे लसणवाडी या गावात महिनाभराखाली हातभट्टी काढण्याचे साहित्यसह अड्डा उध्वस्त करण्यात आला होता. त्यानंतर आता खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप अन्येबोईनवाड आणि पोलिसांनी लसणवाडी शिवारातील नाल्याकाठच्या खड्ड्यात धाड टाकून 200 लिटर रसायन सह हातभट्टी दारू काढण्याचे साहित्य दि. 4 रोजी दुपारी 2 वाजता नष्ट करण्यात आले.
पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत अवैधरीत्या दारू विक्री हातभट्टी दारू सह इतर अवैध व्यवसायाच्या ठिकाणी धाडी टाकणे सुरू असून , अनेक ठिकाणी मोठमोठे हात भट्टी दारूचे अड्डे उध्वस्त करण्यात आलेले आहेत. मौजे लसणवाडी येथे याआधी असाच अड्डा उध्वस्त करण्यात आला होता. त्यानंतर आता खबऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार दि.०४ फेब्रुवारी रोजी जंगलाला लागून असलेल्या नाल्यातील खड्ड्यात दारू काढण्याचे साहित्य जमवल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी संदीप अन्येबोईनवाड, पोहेका गोपनवाड, पोहेका सत्यपाल मडावी, पोका सोनसळे यांनी माहिती घेत नाला गाठून येथे जमविलेले 200 लिटर रसायनसह साहित्य नष्ट करत अज्ञाता विरुद्ध कारवाही प्रस्तावित केली आहे.


















